जर तुम्हांला वजन कमी करायचे (Weight Loss) असेल किंवा वजन नियंत्रणात आणायचे असेल, तर यासाठी कॉफी फायदेशीर ठरु शकते.



शरीराला त्वरीत उर्जा देणाऱ्या कॉफी एक पेस्ट मिसळून प्यायल्यावर तुमचं वजन जलद गतीनं कमी होण्यास मदत होईल.



कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे मॅटाबॉलिज्म चांगले होते.



तसेच कॉफीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वजन कमी होते.



कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.



एका रिसर्चमधून असे लक्षात आले आहे की, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.



कॉफी पिणाऱ्या लोकांचा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.



कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं होतं.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.