व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1808.50. रुपये मोजावे लागणार आहे. याआधी 1 एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 171.50 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मागील दोन महिन्यांत 263 रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर ठरवतात. त्यानुसार आज 171.50 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.