एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या सृष्टी तुलीने मुंबईमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आदित्य पंडित याला अटक केली आहे. सृष्टी तुली ही मूळची गोरखपूरमधील असून ती मुंबईत राहायची. एअर इंडियामध्ये ती पायलट म्हणून काम करत होती. मरोळ नाका परिसरातील घरी सृष्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. नॉन व्हेज खात असल्यामुळे बॉयफ्रेंडने तिला मानसिक त्रास दिल्याची माहिती आहे. आदित्य पंडित तिच्यासोबत भांडण करायचा, तिच्या खात्यातून पैसेही काढायचा. या प्रकरणी सृष्टी तुलीच्या कुटुबीयांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे.