शाळेत सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला. शाळेत सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला. त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन नराधमानं त्यांच्या शरीरावर नाहीतर, थेट मनावर आघात केलेत. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या आरोपी चिमुकल्यांना शौचालयात घेऊन गेला शौचालयातच 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. बदलापुरातील ही घटना 12 आणि 13 ऑगस्टची आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याची तक्रार चिमुकल्यांनी कुटुंबियांकडे केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मीडिया रिपोर्ट्सनुसा, 12 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात ही घटना घडली. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. परंतु, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवली नाही, याउलट त्यांना ताटकळत ठेवल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यानंतर शाळा प्रशासनानंही याप्रकरणी कोणतीही कारवाई न करता, प्रकरण दाबल्याचाही आरोप होतोय. दरम्यान, याच प्रकरणी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं आणि आरोपीला आताच्या आता फाशी द्या, अशी मागणी करतंय. आंदोलनकर्ते शाळेत घुसले, तोडफोड केली, तर बदलापूर स्थानकात रेल रोकोही केला पोलिसांनी वारंवार विनंती करुनही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपीला फाशी द्या, ही एकच मागणी आंदोलनकर्त्यांकडून वारंवार केली जातेय.