बदलापुरातील ही घटना 12 आणि 13 ऑगस्टची आहे. 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे याची शाळेत नेमणूक झाली. लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी आरोपीवर देण्यात आली. प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याची तक्रार चिमुकल्यांनी कुटुंबियांकडे केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच, पॉक्सो अंतर्गत गुन्हा असूनही वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी या प्रकरणी चालढकल केली शाळा प्रशासनानंही याप्रकरणी कोणतीही कारवाई न करता, प्रकरण दाबल्याचाही आरोप होतोय. याच प्रकरणी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं आणि आरोपीला आताच्या आता फाशी द्या, अशी मागणी करतंय. आंदोलनकर्ते शाळेत घुसले, तोडफोड केली, तर बदलापूर स्थानकात रेल रोकोही केला पोलिसांनी वारंवार विनंती करुनही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.