चिमुकल्यांवरच्या अत्याचार प्रकरणी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन नराधमानं त्यांना ओरबाडलं बदलापुरातील ही घटना 12 आणि 13 ऑगस्टची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 12 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात ही घटना घडली. धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. परंतु, पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही, याउलट चिमुकल्यांच्या पालकांना ताटकळत ठेवलं तसेच, पॉक्सो अंतर्गत गुन्हा असूनही वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी या प्रकरणी चालढकल केली असे गंभीर आरोप चिमुकल्यांच्या पालकांनी केले आहेत. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं आंदोलनकर्ते शाळेत घुसले, तोडफोड केली, तर बदलापूर स्थानकात रेल रोकोही केला पोलिसांनी वारंवार विनंती करुनही आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपीला आत्ताच्या आता फाशी द्या, एकच मागणी आंदोलकांनी लावून धरलीय.