भारतीय संघाच्या अनेक क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

भारताचा माजी क्रिकेटपटू सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती सिंह यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Image Source: facebook

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती या दोघांनीही इन्स्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन एकमेकांना अनफॉलो केलंय.

Image Source: facebook

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अनेक दिवसांपासून वेगळे राहत आहेत आणि घटस्फोट घेणार, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली आहे.

Image Source: facebook

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी

शिखर धवनने आठ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला.

Image Source: facebook

दिनेश कार्तिक आणि निकिता

दिनेश कार्तिकने 2012 मध्ये निकितापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलशी लग्न केले.

Image Source: facebook

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक अत्याचार आणि अनैतिक संबंधांचे आरोप 2018 मध्ये केले होते आणि शमीने हे आरोप फेटाळले. त्यांची कायदेशीर लढाई आजही सुरू आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ आजही वेगळे राहतात.

Image Source: facebook

हार्दिक पांड्या आणि नताशा

2024 मध्ये चार वर्षांच्या लग्नानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा वेगळे झाले. त्यांचा एक अगस्त्य नावाचा मुलगा आहे.

Image Source: facebook

युझवेंद्र चहल आणि धनश्री

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.

Image Source: facebook