इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम अल्बी मॉर्केलच्या नावावर आहे.
2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने 125 मीटरचा षटकार मारला होता.
आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात लांब षटकार प्रवीण कुमारच्या नावावर आहे.
या पठ्ठ्याने 2011 मध्ये पंजाब किंग्जकडून फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 124 मीटर लांबीचा षटकार मारला होता.
आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात लांब षटकार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने मारला आहे.
2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने हा षटकार मारला होता.
भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पा आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात लांब षटकार मारतो.
2012 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने 120 मीटरचा षटकार ठोकला होता.
आयपीएलमधील पाचवा सर्वात मोठा षटकार ख्रिस गेलचा आहे. 1013 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने 119 मीटरचा षटकार मारला होता.