ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडल्यानंतर स्मिथने हा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत भारताचा 4 गडी राखून पराभव झाला.
स्मिथ टी20 आणि कसोटी मालिका खेळणार.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्मिथने भारताविरुद्ध 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
स्टीव्हन स्मिथने 19 फेब्रुवारी 2010 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
स्मिथने 170 एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत एकूण 5,800 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 12 शतके आणि 35 अर्धशतके आहेत.
एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 43.28 च्या सरासरीने गोलंदाजी करताना 28 बळी घेतले.
तो 2 वेळा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे.