भारतीय संघ टी 20 विश्वचषक 2024 विजयानंतर आणखी एका आयसीसीच्या स्पर्धेसाठी सज्ज झालाय.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच टीम इंडियाने, इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला आहे.
पुढील 6 दिग्गज गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
भारत विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यानंतर पॅट कमिन्सला दुखापत झाली होती. त्यानंतर तो श्रीलंका विरूद्धच्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला होता.
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत सामन्यात त्याच्या पायाचा डाव्या घोट्यात दुखापत झाली होती त्यानंतर मिचेल स्टार्कने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज अँरिक नोर्कियाला पाठीत दुखापती असल्याने त्याने माघार घेतली आहे त्याच्या जागी 30 वर्षीय कार्बिन बॉशला संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला भारत विरूद्धच्या चौथ्या बॉर्डर गावस्कर कसोटी सामन्यात दुखापत झाली होती.
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोइत्झेच्या, जानेवारी महिन्यापासून स्नायूंमध्ये दुखापत आहे.