ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवातही चांगली झाली आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराज आणि मार्नस लॅबुशेन यांच्यातील भांडण चर्चेचा विषय राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 33 वे षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज मोहम्मद सिराजच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लॅबुशेनला किरकोळ दुखापत झाली.
पण पुढचा चेंडू मार्नस लॅबुशेनच्या अवघड जागी लागला.
तेव्हा मार्नस लॅबुशेन वेदनेने कळवळला.
नंतर लॅबुशेनसाठी वैद्यकीय मदत बोलावण्यात आली.
लॅबुशेनला अशा जागी बॉल लागला की कोणीही काही करू शकत नव्हतं.
बॉल लागल्यानंतर काही काळ अस्वस्थ झाल्यानंतर लॅबुशेनने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली.