टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक मारलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नितीश कुमार रेड्डी दमदार शतकी खेळी केली. नितीश कुमार रेड्डीचं कसोटीतील हे पहिलं शतक आहे. त्याने 171 व्या चेंडूवर चौकार मारुन शतक पूर्ण केलं. नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियातील कसोटीमध्ये शतकी खेळी करणारा तिसरा युवा भारतीय ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांच्या नावावर हा विक्रम आहे. नितीशने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तुफान खेळी केली. यावेळी स्टेडिअममध्ये त्याचे वडिलही उपस्थित होते, ते नितीशची दमदार कामगिरी पाहून भावूक झाले. नितीश रेड्डीने टीम इंडियासाठी एकट्याने खिंड लढवत दमदार शतकी खेळी केली.