हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटबाबत चर्चा रंगली आहे.
हार्दिक आणि नताशाने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरी दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे.
हार्दिक आणि नताशा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
2018 साली हार्दिक पांड्याने बॉलिवूडमधील कलाकारांना पार्टीमध्ये बोलावले होते. यावेळी नताशा देखील आली होती. तेव्हापासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना ओळखू लागले.
दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै 2020 रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशाचे इन्स्टाग्रामवर 3.9 मिलियन फॉलोअर्स आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशाचे इन्स्टाग्रामवर 3.9 मिलियन फॉलोअर्स आहे.
नताशा अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नताशाने बॉलिवूडमध्येही काम केले आहे.
भारतातील लोकप्रिय शो असलेल्या बिग बॉसमध्ये देखील नताशाने सहभाग घेतला होता. 2014 मधील बिग बॉसमध्ये नताशाने सहभाग घेतला होता.