इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने (Sarfaraj Khan) अर्धशतकी सलामी दिली.

एकीकडे कर्णधार रोहित शर्मा धडाकेबाज शतक ठोकून परतल्यानंतर,

रवींद्र जाडेजाच्या साथीला आलेला सरफारज खानने वन डे स्टाईल अर्धशतक झळकावलं.

तर दुसरीकडे सर रवींद्र जाडेजानेही घरच्या मैदानात अर्धशतकी वाटचाल केली.

सरफराजने अवघ्या 48 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले.

सरफराजच्या वन डे स्टाईल अर्धशतकाने प्रेक्षक गॅलरीत बसलेले वडील आणि पत्नीचा उर अभिमानाने भरून आला.

सरफराज खानच्या पदार्पणाने बापाच्या डोळ्याच्या कडा आनंदाने ओल्या झालेलं संपूर्ण देशाने आजच सकाळी पाहिलं होतं.

त्याच बापाच्या अश्रूचं सोनं सरफराजने अर्धशतकाने केलं.

एकीकडे रवींद्र जाडेजा शतकाकडे वाटचाल करत असाताना, सरफराज खानने आल्या आल्या धुलाईला सुरुवात केलं.

रवींद्र जाडेजाने जेमतेम 8-10 धावा केल्या असतील, तोपर्यंत सरफराज खानने चौकार-षटकार लगावून अर्धशतक पूर्ण केलं.