एका तक्रारीच्या आधाराने, म्हाडाने सरावासाठी वापरले जाणारे टर्फ उखडून टाकले आहे.
ज्यात या टर्फचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी केला जातोय असे म्हटले होते.
मात्र गेली 29 वर्ष कोच दिनेश लाड यांनी याच मैदानात रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर सारखे असंख्य क्रिकेटपटू घडवले. आता त्यांनी मुलींना देखील प्रशिक्षण देणे सुरू केले होते.
कारवाई करू नये यासाठी त्यांनी म्हाडाला 2 दिवस आधी विनंती देखील केली होती परंतु त्याच्या काही उपयोग झाला नाही.
इतक्या वर्षांची मेहनत एका दिवसात वाया गेल्याने दिनेश लाड भावूक झाले आहेत.
दिनेश लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे.
दहिसरचे मैदान कायमस्वरूपी आणि मोफत मला देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
म्हाडाने परत नवीन टर्फ बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.