थंडी हळूहळू वाढत चालली आहे.या दिवसात पायांच्या टाचांना भेगा पडण्याचा त्रास अनेकांना जाणवतो.

टाचांना भेगा पडू नयेत यासाठी मग बरेचसे पैसेही खर्च होतात पण परिणाम काही मिळत नाही.

कोरफड आणि ग्लिसरीन वापरा

कोरफडीचे गर एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन मिक्स करा.

कोमट पाण्यात पाय स्वच्छ करा आणि टाचांवर लावा.

झोपताना फक्त सुती मोजे वापरा.पायांच्या त्वचेला हवा मिळण्यास आणि मॉइस्चराइज करण्यास मदत करतात.

भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहते.

आजकाल पायांसाठी मास्क देखील उपलब्ध आहेत जे भेगा पडलेल्या टाचांवर लावले जातात.

टाचांची मृत त्वचा सोबतच काढून टाकतात. टाचांवर द्रव पट्टी लावली जाते जी स्प्रेसारखी असते.