देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9,355 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये. काल दिवसभरात 26 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5,31,424 रुग्णांचा मृत्यू झालाय. बुधवारी (26 एप्रिल) देशात कोरोनाचे 9,629 रुग्ण आढळले होते, तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला होता. बुधवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये केरळमधील 10 रुग्णांचा समावेश होता. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 57,410 वर पोहोचलीये. तर देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 4.08 टक्क्यांवर पोहोचलाय. कोरोना गाईडलाईन्सचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जातंय.