गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 430 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.
देशात एका दिवसात 3 हजार 375 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल देशात 3 हजार 805 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
देशात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील कोरोना सकारात्मकता दर 1.28 टक्के आणि साप्ताहिक कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.35 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या देशात 37 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 45 लाख 53 हजार 42 वर पोहोचली आहे.
मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात 3,375 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 673 वर पोहोचली.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे.