देशातील कोरोनाचा वेग मंदावतोय. देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात 3 हजार 615 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


काल कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 230 इतकी होती.


कालच्या दिवसातील रुग्णसंख्येच्या तुलनेने 385 रुग्णांची वाढ झाली असली, तरी हा आकडा तीन हजारांवर असणे ही एक दिलासादायक बाब आहे.


कारण जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोबाधितांची संख्या तीन हजारांपर्यंत खाली घसरली आहे.


देशात कोरोनाच्या आलेखामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.


देशात गेल्या 24 तासांत 4 हजार 972 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाख 9 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात आतापर्यंत 217 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत.


सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे.