देशात गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोना संसर्गात पहिल्यांदा मोठी घट झाली आहे.


जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे.


देशात गेल्या 24 तासांत नव्या 3 हजार 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.


देशात सध्या सक्रिय रुग्ण दराहून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे.


देशात सध्या पॉझिटिव्हिटी रेट 1.18 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे.


देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे.


देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 3 हजार 230 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याआधी 1 जून रोजी हा आकडा तीन हजारांवर होता.


त्यानंतर या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 1 जून 2022 रोजी देशात 3712 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.




देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.


देशात सध्या 42 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी सोमवारी ही संख्या 43 हजारांवर होती. तर त्याआधी रविवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 44 हजारांवर होती.