देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

देशात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बुधवारी दिवसभरात 6 हजार 422 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच गेल्या 24 तासांत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्येत 1 हजार 314 रुग्णांची वाढ झाली आहे.

भारतात बुधवारी दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना महामारी पसरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 748 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 46 हजारांहून जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत.

सध्या देशात 46 हजार 389 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.