देशातील कोरोना संसर्गात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.



त्या आधीच्या दिवशी 6 हजार 422 कोरोना रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्येमध्ये 123 रुग्णांची घट झाली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे.



देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



भारतात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.



भारतात गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवभरात 5 हजार 916 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.



गुरुवारी दिवसभरात 23 रुग्णांच्या मृत्यूसह एकूण कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 28 हजार 273 इतका झाला आहे.



सध्या देशात 46 हजार 148 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर म्हणजे पॉझिटीव्हिटी रेट 1.89 टक्के आहेत.



आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट 1.70 टक्के आहे.



गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार 964 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.