देशात गेल्या तीन दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग किंचित कमी झाला आहे



आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे



देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशात गुरुवारी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता



आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय



महाराष्ट्रात शुक्रवारी 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत



आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत



राज्यात आजपर्यंत एकूण 78,95,954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत



भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 65 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



सध्या भारतात 1 लाख 34 हजार 793 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत



सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे.



गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.