देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे



देशात मागील 24 तासांत 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे



देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 551 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे



याशिवाय गुरुवारी दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



बुधवारी देशात 19 हजार 893 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली



देशात मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत



गुरुवारी दिवसभरात 21 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात एकूण 4 कोटी 34 लाख 45 हजार 624 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे



कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असणे ही दिलासादायक बाब आहे