देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. मागील सलग चार दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटली होती यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला गेल्या 24 तासांत 17 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे देशात बुधवारी दिवसभरात 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 3 हजार 610 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या भारतात 1 लाख 37 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे गेल्या 24 तासांत 19 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे