कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये मोठी दिलासादायक बातमी आहे देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे इतकच नाही तर नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे देशात सोमवारी दिवस 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले असून गेल्या 24 तासांत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे रविवारी दिवसभरात देशात 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले असून तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोरोनाचा घटता आलेख ही एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 897 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 33 लाख 83 हजार 787 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सध्या भारतात 1 लाख 39 हजार 792 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.32 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे