देशात कोरोना संसर्गातील वाढ कायम आहे

देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे

गेल्या 24 तासांत 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला

सध्या भारतात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत

देशात 18 हजार 558 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत

भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 84 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे

गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 5.02 टक्के आहे