सध्या देशात नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण कमी आहे
देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
चीनमध्ये सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये दिवसागणिक लाखो नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
कोरोनामुळो होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. चीनसह जपान आणि अमेरिकेतही कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार अलर्टवर आहे
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.
भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
आता भारत बायोटेकची नेझल कोरोना वॅक्सिन कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लस आता कोविन ॲपवर उपलब्ध आहे.
काळजी घ्या! देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार; भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा...