जगभरातील वाढता कोरोना उद्रेक पाहता, भारतात सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत. केंद्राने राज्यांना जीनोम सिक्वेंसिंगचेही आदेश दिले आहेत.
नागरिकांना मास्क वापरण्याचं आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.
देशात आज 227 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर भारतात सध्या 3424 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी असणे, ही एक दिलासादायक बाब आहे.
मात्र नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेणे गरजेचं आहे. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
देशात कोरोनाच्या BF.4 चा धोका लक्षात घेता केंद्र सरकार सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. येथे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानंतर विमानतळावर रँडम कोविड चाचणी करण्यात येत आहे. IGI विमानतळावर, दररोज सरासरी येणाऱ्या 25 हजार प्रवाशांपैकी सुमारे दोन टक्के लोकांची रँडम कोविड चाचणी केली जात आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा धोका पाहता सतर्कतेची पाऊले उचलली जात आहेत.
मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही राज्यांनी खबरदारी म्हणून मास्कसक्ती लागू केली आहे.