सध्या देशात 3,380 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात गेल्या 24 तासांत 163 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. भारतातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांहून कमी आहे.
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. सध्या याच व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.
IMA कडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, लोकांना सार्वजनिक स्थळी लग्न, समारंभ, राजकीय किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता कर्नाटकमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने एसी रूममध्ये आणि बंद ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.
केंद्राने राज्यांना कोरोना संदर्भातील पुढील रणनीती आखण्याची सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार खबरदारीचे उपाययोजना करताना दिसत आहे.
सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
भारतात कोरोनाचे रुग्ण कमी असले, तर नागरिकांना निष्काळजीपणा करु नये. आरोग्याची काळजी घ्या मास्क वापरा.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की, देशभरातील रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.