देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दिवसभरात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.



आदल्या दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्या 1 हजार 778 रुग्ण घटले आहेत.



बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या 7 हजार 946 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.



गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात उत्साहाचं वातावरण असताना कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब आहे.



देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 685 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.



देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे.



सध्या देशात 59 हजार 210 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.



भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 932 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 212 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.