देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.



रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती.



जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली गेली आहे.



शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.



देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी 7 हजार 591 रुग्ण आढळले.



रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.



महाराष्ट्रात रविवारी 1639 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1698 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.



महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.