गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या घसरली आहे. देशात तब्बल तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. दोन वर्षांनंतर यंदा कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त होत देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही आणखी एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झालीय.