इंडियन इॅन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या (IIM Nagpur) नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन व लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्या उपस्थितीत झालं
नागपूरच्या मिहान परिसरात 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले आहे.
सध्या 665 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे..
आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत.
आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत.
या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.
या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.
या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.
आयआयएम नागपूरचे जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे.
समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत.
समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत.
देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे.
इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे.