अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे.



प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.



आज (23 एप्रिल) अबिनेत्री प्रिया मराठे आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.



‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या हिंदी मालिकांमध्येही प्रियाने कायम आठवणीत राहतील अशा भूमिका केल्या आहेत.



‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी प्रियाने लग्नगाठ बांधली आहे.



मैत्रीपासून सुरु झालेलं हे नातं 2012मध्ये लग्नात रुपांतरीत झालं.



प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे. अभिनेत्रीने स्वतःचा एक कॅफे देखील सुरु केला आहे.



अभिनयासोबतच ती हा व्यवसाय देखील सांभाळते.



मालिका, चित्रपटच नव्हे तर, प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय आहे.



‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.