अलिकडच्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे गेल्या काही दिवसामध्ये वाढत असलेला कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे रविवारी दिवसभरात देशात 16 हजार 464 नवीन कोरोनाबाधित आढळले, तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे देशात सध्या एक लाख 43 हजार 989 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत देशात एकूण 5 लाख 26 हजार 396 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत रविवारी 16 हजार 112 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 65 हजार 890 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे