भारतात कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत असला, तरी धोका मात्र कायम आहे देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं आढळून आलं आहे देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशात गेल्या 24 तासांत 19 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारावर पोहोचली आहे काही दिवसांपूर्वी ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली होती, सध्या देशात 1 लाख 43 हजार 676 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत देशात एकूण 5 लाख 36 हजार 357 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत शनिवारी 19 हजार 336 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 49 हजार 778 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे