देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे

देशात मागील 24 तासांत 16 हजार 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

याआधी म्हणजेच शनिवारी दिवसभरात 18 हजार 738 रुग्णांना नोंद आणि 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता

दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे

देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे

रविवारी दिवसभरात 15 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

देशात आजपर्यंत 4 कोटी 34 लाख 99 हजार 659 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत

देशात गेल्या 24 तासांत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे