देशात कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली आहे, मात्र धोका कायम आहे. देशात गुरुवारी 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचिंत कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 697 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत देशात 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे.