देशातील कोरोना संसर्ग मागील काही दिवसांपासून वेगवान होताना दिसत आहे
आरोग्य तज्ज्ञांकडून चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
देशात शनिवारी दिवसभरात 12 हजार 899 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे
गेल्या 24 तासांत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार सध्या एकूण 72 हजार 474 सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत
देशात 8 हजार 518 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत
कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे
देशात दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे
गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे
11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला असून ही चिंताजनक बाब आहे