साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे.



अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली.



काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे.



काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.



काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या बॉलिवूड चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात काजलने ऐश्वर्या रायच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.



या चित्रपटानंतर काजल तमिळ दिग्दर्शक भारतीराजाच्या ‘बोमलट्टम’ या चित्रपटात दिसली.



बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळत नसल्याचे पाहून काजलने तामिळ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. तिने 2007मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’मध्ये अभिनेता कल्याण रामसोबत तेलगूमध्ये पदार्पण केले.



हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी जादू शकला नाही. त्यानंतर ती त्याचवर्षी ‘चंदामामा’मध्ये दिसली.



हा चित्रपट काजलचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. यानंतर, 2009 मध्ये रिलीज झालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली.



साऊथमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर काजलने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.



Thanks for Reading. UP NEXT

19 जून : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

View next story