देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे



गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली होती



मात्र, या आठवड्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, त्या आधी बुधवारी 12 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद झाली होती



एका दिवसात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये तब्बल 3146 रुग्णांची वाढ झाली आहे



यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.



देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे



आता देशात एकूण 1 लाख 1 हजार 830 कोरोना रुग्ण आहेत. तर गुरुवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 31 लाख 52 हजार 882 डोस देण्यात आले आहेत.



देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.47 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 3.90 टक्के आहे



देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के आहे