देशात सलग दोन दिवस वाढणारा कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे



गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे



रुग्णसंख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत मोठी घट झाली आहे



देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 2,482 रुग्ण घटले



देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे



एक सकारात्मक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजारांहून अधिक आहे



देशात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे



गेल्या 24 तासांत 13 हजार 900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



कोरोना महामारी सुरु झाल्या आतापर्यंत भारतात 4 कोटी 36 लाख 99 हजार 435 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत



देशव्यापी लसीकरण मोहिमेत 19 ऑगस्ट 2022 पर्यंत 209 कोटींकडून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत