देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे.


आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.


गेल्या 24 तासांत 343 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर चार रुग्णांना आपला जीव गमावला आहे.


दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे.


जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे.


चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.


मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.


आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 30 हजार 612 वर पोहोचली.


देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर आहे.


सध्या देशात 5,263 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत, काल ही संख्या 5,395 इतकी होती.


देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.