भारतात मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 294 नवे कोरोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.

यानुसार, कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात सध्या 6 हजार 209 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत.

देशात 2020 साली कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला.

मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

याआधी 30 मार्च 2020 रोजी 227 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर जगभरासह देशातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला.

देशात लाखो नव्या रुग्णांची भर पडताना दिसत होती. आता हे प्रमाण फार कमी झालं असून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.

देशात 5 मे 2021 रोजी 24 तासांत सर्वात जास्त 4 लाख 12 हजार 431 कोरोना रुग्ण सापडले होते.

त्यानंतर यावर्षी 20 जानेवारी 2022 रोजी एका दिवसात 3 लाख 47 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.

आता हे प्रमाण 294 वर पोहोचलं आहे, ही फार मोठी दिलासादायक बाब आहे.