गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्या घटताना पाहायला मिळत आहे. मात्र आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.

देशात 408 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेने आज कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, तर गेल्या 24 तासांत पाच रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात चार कोटीहून अधिक जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्या पैकी अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 5 हजार 881 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.

देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 70 हजार 483 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात 5 लाख 30 हजार 601 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेक रुग्णांना इतरही आजार होते.

एकीकडे कोरोना रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत गोवरचा संसर्ग वाढत आहे.

मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोवरमुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील गोवरचा संसर्गाच्या बळींची संख्या 12 वर पोहोचली आहे.