देशातील नवीन रुग्णांची संख्या घटली आहे.



देशात 406 नवीन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या 6402 इतकी आहे.



देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. नवीन रुग्णांची संख्या 500 हून कमी आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 406 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



त्यामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसतोय. ही एक चांगली बाब आहे.



एकीकडे देशातील कोरोनाचा वेग मंदावला असला, तरी धोका कायम आहे. त्यातच दुसऱ्या विषाणूजन्य आणि साथीच्या आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे.



मुंबईसह देशभरात गोवर आजाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण झाली आहे.



त्यासोबतच हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप आणि फ्लूची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.



त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.