केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे.

देशात 2 हजार 430 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 248 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.

काल ही संख्या 2,678 वर होती. गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी दिवसभरात देशात 2430 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 26 हजार 427 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजार 618 वर पोहोचली आहे.

मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 874 वर पोहोचली.

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजारांवर कायम आहे.

सध्या देशात 26 हजार 618 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 378 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.