मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉरचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.



मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे. महाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असंही म्हणतात.



महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.



या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आला आहे. महाकाल लोक वास्तूकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.



महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. याशिवाय सुंदर वास्तूकला आणि नक्षीकाम असलेले 108 स्तंभ आहेत.



शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मुर्ती, 50 हून अधिक भित्तीचित्रे आणि कारंजे अशा या कॉरिडॉरची वैशिष्ट्य आहेत.



महाकाल लोक 900 मीटरहून अधिक लांब कॉरिडॉर आहे. हा भारतातील सर्वात मोठं कॉरिडॉर आहे.



महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत. यातील एक म्हणजे नंदी द्वार आणि दुसरं पिनाकी द्वार.



हा महाकाल कॉरिडॉर भाविकांना नंदी द्वारपासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.



उज्जैनमधील प्राचीन महाकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशानं हे महाकाल लोक उभारण्यात आलं आहे.



उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.



देश-विदेशातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.



पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.



पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी खर्च आला आहे.