सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, दरम्यान नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
गेल्या 24 तासांत दोन हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे पुन्हा एकदा दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात काल 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 15 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजे आज तुलनेनं 467 कोरोना रुग्ण कमी झाले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील कोरोनाबळींच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे.
कोरोना महामारी सुरु झाल्या आतापर्यंत देशात 5 लाख 28 हजार 822 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामधील अधिक रुग्णांना मधुमेह, रक्तदाब या संदर्भातील आजार होते.
देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असल्यामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे.
देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.
मागील 24 तासांत महाराष्ट्रात 231 नवीन रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 111 रुग्ण मुंबईतील आहेत.